Tuesday, August 26, 2014

भोजन पात्रे

भोजन पात्रे

चांदिच्या ताटात जेवणे पित्तशामक आहे.
काशाच्या ताटात जेवणे बुध्दिप्रद व रक्तपित्तशामक आहे.
पितळेच्या ताटात जेवणे वातकारक, रुक्ष व उष्ण आहे.
लोखंडाच्या ताटात जेवणे कामलानाशक व सिध्दिदायक आहे.
लाकडाच्या ताटात जेवणे कफकारक व रुचिदायक आहे.
दगड मातिच्या ताटात जेवणे दारिद्र्याचे लक्षण आहे.
पानावर जेवणे रुचिकारक, अग्निदीपक व विषनाशक आहे.

(वरील धातू व वस्तू मध्ये जेवणे व जेवण बनवणे दोन्हीसाठी वरिल गुण दोष लागू आहेत. शिवाय या गोष्टी एकदाच केल्याने नव्हे तर नियमित केल्यानेच वरील गुण दोष दिसून येतील. )

जेवताना अथवा जेवण बनवताना भोजन पात्राचा काही अंश भोजनाबरोबर शरिरात जातो त्यामुळे भोजन पात्रे महत्वाची ठरतात. जसे पानातून जेवताना गरम अन्नपदार्थ पानातील रस व गंध शोषतात व ती अन्नबरोबर शरिरात जातात. म्हणून पूर्वीच्या लोकांनी काही वनस्पतींची पाने वर्ज करावयास सांगितली आहेत. जसे बिब्ब्याची पाने मोठी व पत्रावळी बनविण्यास सोयीची असतात पण ती अपायकारक असतात म्हणून घेऊ नये. भोजनासाठी लागणारी पाने ही गुणकारी नसली तरी अपायकारक नसावी याची काळजी घ्यावी.

तांबे व चांदी हे जंतूनाशक आहेत, ४ तास तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी शुध्द व जंतूरहित बनते.

No comments:

Post a Comment